एटापल्ली: तालुक्यातील पिपली बूर्गी येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हंटले आहे”की”पिपली बुर्गी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र मागील वर्षी सुरू करून खरेदी करण्यात आले होते.परंतु यावर्षी मौजा पिपली बुर्गी अद्यापही शेतकऱ्यांचे सात बारा ऑनलाईन करणे सुद्धा संस्थेचा वतीने किंवा महामंडळाचा वतीने सुध्दा सुरु करण्यात आलेले नाही.तेव्हा ऑनलाईन संस्थेचा सचिवाला विचारणा केली असता.खरेदी केंद्र घोटसुर येथे येऊन ऑनलाईन करण्यात यावे असे सांगण्यात आले होते.तेव्हा पिपलीबुर्गी ते घोटसुरचे अंतर १५ ते २० किलो मिटर अंतरावर आहे.
तसेच घोटसुर येथील ऑनलाईन नोंदणी करीता गेले असता ५ ते ६ दिवस ऑनलाईन करण्यासाठी नंबर लागत नसून.आम्हाला उगच ये-जा करण्याचा त्रास सहन करावे लागत आहे.तेव्हा मौजा पिपली बुर्गी येथे ऑनलाईन नोंदणी करणे करीता आपल्या कार्यालया कडून प्रतिनिधी पाठवण्यात यावे तसेच पिपलीबूर्गी येथील मागील वर्षी प्रमाणे पिपली बुर्गीं येथे तातलीने धान खरेदी केंद्र सुरू करून पिपलीबुर्गीचा कार्यक्षेत्रातील समस्त शेतकऱ्याचे धान खरेदी करण्याचे.आपल्या कार्यालय कडून पर्यायी व्यवस्था करण्यात यावे
अन्याय आविसं काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात सर्व शेतकऱ्यांनी टी.डी.सी.कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सदर निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी निवेदन देतांना मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,गणेश दासरवर,चामृजी उसेंडी,चांदुजी नरोटे,स्वप्नील कांनालवर,सुरेश मट्टामी,सुधाकर पुडो,सुखरूजी पुडो,पांडू गावडे,गोशू लेकामी,चंदू मट्टामी,नरेश गर्गमसह हालेवारा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.