Home मुख्य बातम्या मुलचेरा नगरपंचायत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन डी.पी.आर.अंतर्गत कंपोस्ट बीन्स च्या खरेदीची चौकशी करून...

मुलचेरा नगरपंचायत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन डी.पी.आर.अंतर्गत कंपोस्ट बीन्स च्या खरेदीची चौकशी करून भ्रष्टाचारी अध्यक्ष आणि कार्यान्वित यंत्रणेवार कारवाई करा

75
0

मुलचेरा : नगरपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत अभियान नागरी घनकचरा व्यस्थापन प्रकल्पास संदर्भात पत्र पहिला अन्वेये मान्यता देण्यात आली होते.तसेच संदर्भात पत्र क्रमांक दोन नुसार स्वछ महाराष्ट्र अभियान अंतर्गत सुधारित प्रशासकीय मान्यता रु.44.1 लक्ष कंपोस्ट बीन्स आणि MRF शेड करिता निधी मंजूर करण्यात आली.

त्यानुसार सदर DPR मधील कंपोस्ट बीन्स चे Gem पोर्टल वार टाकण्यात आली आहे.तीन बीडर पैकी AVH Enterprise यांना आर्थिक बीड प्राप्त झाले आहे.दिनांक 7 डिसेंबर 2023रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी हरकतीचा मुद्दा म्हणून कंपोस्ट बीन्स विषय विचारणा केली असतं.

सदर बीन्सचे देयके रु.14,39,520/-दिनांक 20-11-2023रोजी अदा करण्यात आल्याची माहिती पूरविण्यात आली.अतिशय निकृष्ट दरजेचे बीन्स असून वस्तूस्थिती नुसार रु.200/-ते 300 दराने बाजारभाव असलेल्या प्रत्येक रु.2999/- इतक्या दराने 500 नग खरेदी करण्यात आली आहे.परंतु आजतागायत नागरिकांना बीन्सचे वाटप करण्यात आले नाहीत.

दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजीच्या सर्वसाधारण सभेत सदर कंपोस्ट बीन्सच्या विनिर्दशानुसार प्राप्त साहित्याची दर्जा आणि स्थिती उत्तम नसल्याने उच्चस्तरीया चौकशी करण्यात यावी.असे ठरविण्यात आली आहे.अंदाजित रु.12 लक्ष पेक्षा अधिक रक्कमेचा नगरपंचायत चे अध्यक्ष आणि यंत्रणेमार्फत गौरव्यवहर करून भ्रष्टाचार करण्यात आली आहेत.सदर कंपोस्ट बीन्सच्या भ्रष्टाचार तातडीने चौकशी करून दोषीवार कारवाई करण्यात यावे.

अशी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोको माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देतांना अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here