अहेरी : तालुक्यातील हालेवारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हंटले”कि”अनेक वर्षी पासून धान खरेदी केंद्र सुरु होते.मात्र धान खरेदी केंद्र आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था हालेवारा चालवीत होते.संस्थेला मागील अनेक वर्षीपासून खरेदी कमिशन हमाली रक्कम ना मिळाल्याने मालाची उचल वेळेवर न केल्याने येणाऱ्या अवाजवी घटी तुटीस आल्यास संस्थेला जबाबदार धरून कार्यवाही कारवाई करण्यात येते.
संस्थेला कमिशन दिल्या जात नाही.तसेच संस्थेला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिल्या जात नाही.हागामी 2023-24मध्ये संस्था खरेदी करण्यास तयार पण नाही आहे.असे संस्थेने व संस्था कर्मचारी – पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आपल्या कार्यालयाला लेखी कळविले आहे.
आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय अंतर्गत खरेदी करणाऱ्या असल्याचे सांगितले होते.परंतु आज पर्यंत हालेवारा येथील खरेदी केंद्र सूरू झालेले नाही.तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्यासाठी या वर्षी खूपच अडचण भासत आहे.शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करिता खरेदी केंद्र कसनसुरु सांगायचं”कि”खरेदी केंद्र एटापल्ली सांगायचे तर कधी खरेदी केंद्र तोडसा येते जाऊन नोंदणी करण्याकरिता सांगायचे.
शेतकऱ्यांना वारंवार त्रास देणे सुरु आहे.वारंवार ऑनलाईन नोंदणी करिता वारंवार चक्कर मारा लागत आहे.शासनाकडून ऑनलाईन नोंदणी निशुल्क असून सुद्धा प्रति शेतकऱ्यांना ऑनलाईन साठी 50/- ते 100 रुपये घेण्यात येत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणे सुरु आहे.
त्रासला कंटाळून काही शेतकऱ्यांना आज पर्यंत ऑनलाईन केलेले नाही.कस्ताकरांना अडचणीत असून सुद्धा शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे.
तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी व कार्यवाही करून.हालेवारा येथील धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावी.अन्याय आविसं काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात सर्व शेतकऱ्यांनी टी.डी.सी.कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सदर निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी निवेदन देतांना मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गणेश दासरवर,चामृजी उसेंडी,चांदुजी नरोटे,स्वप्नील कांनालवर,सुरेश मट्टामी,सुधाकर पुडो,सुखरूजी पुडो,पांडू गावडे,गोशू लेकामी,चंदू मट्टामी,नरेश गर्गमसह हालेवारा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.