भामरागड : तालुक्यातील पिटेकसा येथील जेष्ठ नागरिक सोमा महाका यांची काही दिवसांन पासून प्रकृती गंभीर असल्यामुळे गडचिरोली ग्रामीण रुग्णालय येते भर्ती करण्यात आली आहे.मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना परत ग्रामीण रुग्णालय गडचिरोलीतुन
भामरागड ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचविण्या करिता त्या कुटुंबियांना अडचण भासत होती.
हीबाब आविसं काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना रुग्णाच्या नातेवाईक व आविस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कळताच क्षणाचा हि विलंब न करता महाका परिवाराला ऑनलाईन द्वारे रक्कम पाठवण्यात आली आहे.सदर आर्थिक मदत राजू महाका,मुंशी धुर्वा यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी स्थानिक आदिवासी विध्यार्थी संघा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महाका परिवारातील नातेवाईक सदस्य उपस्थित होते.