Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक मदत

23
0

भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत बोटनपुडी अंतर्गत येत असलेल्या विसामुंडी येथील चंद्रा गंगा नैताम यांना छातीत पाणी जमा होत असल्याने त्यांना शरीरत त्रास होत होती.चंद्र नैताम जवळ असलेल्या सर्व दवाखान्यात जाऊन जाऊन थकले होते.त्यांनी आता चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेण्यास विचार पडले होते.

मात्र नैताम परिवार अंत्यत गरीब असून चंद्रपूर जाण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण भासत होती.हीबाब काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना माहिती देतच लगेच त्या चंद्रा नैताम यांना चंद्रपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करुन दिले तसेच तिकडे औषध व उपचारासाठीही आर्थिक मदत केले आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश संगमवार,किशोर पेंदाम,रमेश ओडीट्टीवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच नैताम परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here