Home अहेरी व्येंकटापूर येथे वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिर ठिकाणी कंकडालवार परिवार स्वखर्चाने बांधले सभामंडप

व्येंकटापूर येथे वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिर ठिकाणी कंकडालवार परिवार स्वखर्चाने बांधले सभामंडप

21
0

अहेरी : तालुक्यातील व्येंकटापूर येथे आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी काही दिवसांअगोदर व्येंकटापुर दौऱ्यावर घेले होते.दरम्यान मंदिर ठिकाणी सभामंडप नसल्याने येणाऱ्या भाविकांना अडचण भासत असल्याची माहिती अजय कंकडालवार यांना सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी येथील भाविक व नागरिकांची अडचण लक्षात घेत माझा स्वखर्चाने सभामंडप बांधून देतो अशी ग्वाही दिले होते.सदर बांधकाम ही पूर्ण झाले असल्याने महाशिवरात्री शुभ दिवशी रोजी सभामंडपाची उदघाटन आई मंदाबाई रामाय्याजी कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

उदघाटन प्रसंगी कंकडालवार पुढे बोलतांना स्वामी वेंकटेश्वर स्वामी मंदिर 60-70 वर्षा पूर्वीची असून हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धा स्थान आहे. परिसरातील भाविक व नागरिक प्रत्येक उत्सहात एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन करत असतात.उत्सववेळी सभामंडप नसल्याने खूपच अडचण भासत होती.मंदिर ठिकाणी सभामंडप उभारल्याने आतापासून भाविकांना अत्यंत सोयीस्कर ठरतो.

कंकडालवार परिवारकडून नव्याने लोकार्पण झालेल्या सभामंडप भाविक भक्तांसाठी अत्यंत सोयउपलब्ध होईल.सभामंडप नसल्याने पावसाळ्यात व उन्हाळ्यात कोणत्याही कार्यक्रमाला असो अडचणीत कार्यक्रम कराव लागत होती.त्यावेळी समस्त गावकर्यांनी कंकडालवार परिवारला आभार मानले.

यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,आई मंदाबाई कंकडालवार,जावई नांदाकिशोर मल्लेरवार, वैभवभाऊ कंकडालवार उपसरपंच ग्रामपंचायत इंदाराम,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतुजी मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,आवलमरी ग्राम पंचायतचे सरपंच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजीव चीलवेलवार, इंदाराम ग्रामपंचायत माजी सरपंच गुलाबराव सोयाम,आवलमरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मारोती मडावी, व्येंकटेशवर देवस्थानचे पुजारी काका, आवलमरी ग्राम पंचायतचे सर्व ग्राम सदस्य,मरपली ग्रामपंचायतचे उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here