अहेरी : अज्ञात कारणामुळे घरात लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला.यानंतर काही वेळेतच संसारोपयोगी साहित्याची राख झाली.सुदैवाने माय- लेक वाचले,पण संपूर्ण घर बेचिराख झाल्याने संसार उघड्यावर आला.सदर घटना अहेरी येथील प्रभाग क्र. १२ मध्ये १ जून रोजी सकाळी १० वाजता घडली.
सिंधू सत्यनारायण कटलावार या विधवा असून त्यांना एक मुलगा आहे.सिंधू या इतरांच्या घरी स्वयंपाक बनवून संसार चालवितात तर त्यांचा मुलगा साई हा मजुरीकाम करतो.१ जूनला सकाळी ९ वाजता नित्याप्रमाणे माय- लेक घर बंद करुन आपापल्या कामाला गेले.इकडे त्यांच्या घराला आग लागली.या आगीने काही वेळेतच संपूर्ण घर कवेत घेतले.यात घरातील सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला.काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले.घरातील रोख ५० हजार रुपये,एक तोळे सोने,कुलर,टीव्ही,कपडे,भांडी व इतर दैनंदिन वस्तू जळून खाक झाल्या.
घरातून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरड केली.पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.पण हे प्रयत्न निष्फळ ठरले.नगरपंचायतमधील अग्निशामक दलाचा बंब उशिरा पोहोचला.तोपर्यंत घराची अक्षरश: राख झाली होती.
या घटनेचे माहिती स्थानिक आविसं काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनकडून आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच तात्काळ अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील प्रभाग क्रमांक 12 येथे घटना स्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतले.तसेच त्या परिवाराला जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केले.
यावेळी अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,काँग्रेसनेते हनिप शेख,संतोष दोंतूलवारसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या अहेरी येथील आगग्रस्त कुटुंबियांना जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत