Home अहेरी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी इंदाराम येथे बैलपोळा उत्सव साजरा

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी इंदाराम येथे बैलपोळा उत्सव साजरा

15
0

अहेरी : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. श्रावण अमावस्येला येणारा बैलपोळा कृषीप्रधान सण म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असतो.

पोळ्याच्या दोन दिवस आधीपासूनच खांदे मळणी करून बैलांचे कोडकौतुक सुरू होते आणि पोळ्याच्या दिवशी त्यांना वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.बैलपोळ्याच्या दिवशी सगळ्यात मोठा मान असतो तो पुरणपोळीचा. या दिवशी बैलांसाठी केली जाणारी पुरणपोळी आपल्या नेहमीच्या पुरणपोळ्यांपेक्षा थोडी वेगळी असते. कणकेचा उंडा मोठा आणि त्यात पुरण कमी अशा पद्धतीची कमी गोड पुरणपोळी भरपूर तूप घालून बैलांना खाऊ घातली जाते.

काल बैलपोळा निमित्त काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या इंदाराम येथील राहत्या घरी बैलांचे पारंपारिक पद्धतीने पूजन केले.कंकडालवार यांनी कुटुंबीयांसमवेत पारंपरिक पद्धतीने पूजन करून बळीराजाचा जोडीदार असलेल्या बैल जोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला.

यावेळी मंदाआई कंकडालवार,उपसरपंच वैभव कंकडालवार,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,सौ.स्मिता वैभव कंकडालवार,विराज अजय कंकडालवार,युवराज अजय कंकडालवार,रिध्वी वैभव कंकडालवार,ऋतुराज वैभव कंकडालवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here