Home राजकीय जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट

76
0

गडचिरोली / नाशिक : आदिवासी विकास महामंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून अहेरी, सिरोंचा, गडचिरोली व आरमोरी या बाजार समित्यांची आधारभूत खरेदीवरील कोट्यवधी रुपयाचे सेस थकीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना प्रशासन चालविणे कठीण जात असून या बाजार समित्यांना उत्पन्नाचे वेगळे साधन नसल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगार करने ही जड जात आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी बाजार समित्यांना अनेक अडचणी येत असल्याने सन 2006 ते 2023 पर्यंतचे सेस आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत असून सदर रक्कम हे बाजार समित्यांचे हक्काचे असून थकीत असलेली सेस तात्काळ मिळवून देण्याची मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.जिल्ह्यातील सेस रक्कम थकीत असलेल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी व सचिवांना सोबत घेऊन अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नाशिक येथे जाऊन आदिवासी विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक श्रीमती. लिला बन्सोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या भेटीत त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे वरील मागणी केली आहे.याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्रीमती.लिला बन्सोड यांच्यासोबत झालेल्या भेटीत सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी चर्चेदरम्यान बाजार समित्यांची आर्थिक परिस्थितीची लेखाजोखा मांडत बाजार समित्यांची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी त्यांनी आविका मार्फत उघड्यावरील धान खरेदीसाठी लागणाऱ्या ताडपत्री खरेदीचे अधिकारासह मोहफुल खरेदी करण्याचे अधिकारही बाजार समित्यांना मिळवून देण्याचीही मागणी निवेदनातून केली आहे.

नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक लिला बन्सोड यांचे सोबत चर्चा करतांना अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांचेसमवेत महेश गुप्ता सचिव कृ.उ.बा.स.अहेरी, महेश गद्देवार निरीक्षक कृ.उ.बा.स.अहेरी तसेच अमिश निमजे सचिव कृ.उ.बा.स.आरमोरी,कृ.उ.बा.स.गडचिरोली नरेंद्र राखडेसह आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here