Home अहेरी अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी : माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी : माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

47
0

अहेरी : तालुक्यातील कर्णेली येथील बापू इस्तरी आत्राम हे जंगल परिसरात सरपण गोळा करण्याकरिता गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.शासनाच्या दुर्लक्षामुळे पुढील उपचार घेणे कठीण होत असल्याने आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपचारासाठी आत्राम यांना आर्थिक मदत केली आहे.काही दिवसांपूर्वी बापू इस्तरी आत्राम हे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले होते.मात्र शासनाकडून त्यांना अद्यापही कोणतीही मदत मिळाली नाही.शासनाच्या दुर्लक्षामुळे व आत्राम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार करणे कठीण होत होते.दरम्यान आत्राम यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन आपबिती सांगितली.यावेळी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तत्काळ मतदीचा हात पुढे करून उपचाराकरिता आर्थिक मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here