Home राजकीय देवालमरी येथे काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात काॅर्नर सभा...

देवालमरी येथे काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात काॅर्नर सभा संपन्न

34
0

गडचिरोली :  गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया / महाविकास आघाडीचे उमदेवार डाॅ.नामदेवराव किरसान यांच्या  प्रचारासाठी अहेरी तालुक्यातील देवालमरी येथे माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पाक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार आणि काँग्रेसनेते कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली काॅर्नर सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती,विधानसभा निरीक्षक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी उपस्थित होते.

दरम्यान काॅर्नर सभेला उपस्थित नागरिकांना येत्या १९ तरीखेला होणाऱ्या गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या दुसऱ्या क्रमांकावर आसलेल्या पंजा या चिन्ह समोर बटण दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्यात यावे असे आवाहन अजय कंकडालवार यांनी केले.

यावेळी संजय गोंडे ग्रामपंचायत सदस्य,महेश लकुर ग्रामपंचायत सदस्य,शंकर आत्राम पेसा अध्यक्ष,   माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सदाशिव बामांकर,नागेश राऊत,येल्लय्या तोगला,सुधीर बामंनकर,संतोष परसावार,गौरूबाई तोकला,किस्टुबाई बोरकुटसह गावातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here