मुलचेरा : तालुक्यातील मलेझरी येथील काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त त्रिरत्न युवा क्रीडा मंडळ मलेझरी यांचे विद्यमाने भव्य पुरुषांचे रात्रकालीन कब्बड्डी सामन्यचे आयोजित केले आहे.कब्बड्डी सामन्यची उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली.
त्यावेळी अजय कंकडालवार मलेझरी गावात आगमन होतच ढोल तशाने,लेजीम नृत्या करत गावात जंगी स्वागत करण्यात आली.त्यावेळी मंडळ कडून अजय कंकडालवार यांची सत्कारही करण्यात आली.सर्व प्रथम कंकडालवार छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक,डॉ बाबासाहेब आंबेडकर,भगवान बिरसा मुंडा प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमा दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी तसेच नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली.मलेझरी येथील प्रवेशद्वार बांधकाम करण्यासाठी येथील नागरिकांना खुपच अडचण भासत होती.गावातील युवकांना एक संकल्पना आली की गावात कबड्डी सामने ठेवून आपल्या गावातील प्रत्येक समाजाला एकजूट करून लोक वर्गणीतून व खेळाच्या माध्यमाने आलेल्या निधीतून मलेझरी येथे प्रवेशद्वाराचे आज कब्बड्डी कार्यक्रमा दरम्यान त्या प्रवेशद्वार बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे.
रात्रकालीन कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक विनोद झाडे,कवडूजी चल्लावार,अज्जू येलमुले,तुळशीरामजी बावणे,शरद कुवडे,राहुल दुधे,दीपक उराडे कडून तसेच तृतीय पारितोषिक गडचिरोली महिला काँग्रेसचे सहसचिव कविता उराडे,मुलचेरा पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमूलवार,मलझरी पोलीस पाटील मारीया कोरडे कडून चौथ्या पारितोषिक जिल्हा परिषद शाळा मलझेरी कडून देण्यात येत आहे.
कार्यक्रमचे सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतु मडावी होते.अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र शहा,कविताताई उराडे सहसचिव महिला कॉग्रेस गडचिरोली,सुवर्णा येमुलवार माजी प.स.सभापती मुलचेरा,मारिया कोरडे पोलीस पाटील मलेझरी,कवडुजी चलावार तं मु स ,अजुभाऊ येलमुले,तुळशीराम बावणे,शरद कुबडे,राहुल दुधे,दीपक उराडे, अडपल्ली (माल)ग्रामपंचायतचे माजी सदस्य विनोदभाऊ झाडे हे होते.
यावेळी बंडुजी बावणे,सिलिप सेडमके,आकाश नागोसे,दिलीप चलावार, प्रीतम अलोने,सचिन राऊत,सुरज चांदेकर,अजय येलमुले,राहुल बावणे,शेखर पोरते,शरद कुबडे,प्रकाश दुधे,समीर इजगीलवार, मंगेश गोहणे,सिद्धांत निमसरकार,प्रफुल येलमुले,स्वप्नील गोहणे,प्रशांत चांदेकर,विफुल दुधेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच खेळ प्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.