Aheritoday तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )
अहेरी येथील नगरपंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी अहेरी यांचेकडून मंजुरी प्रदान केलेल्या अकृषिक आदेशानुसार नियम ब अटीचे उलघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच लेआऊट धारक आपापल्या लेआऊट मध्ये रस्त्यांचे कामाला सुरुवात केली नाही व त्या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यात आली नाही,तसेच प्रॉपर्टी कार्ड 1409 सीट क्र.9 ची कायदेशीर करवाई करण्यात आली नसून आदिवासीची प्रॉपर्टी गैरआदिवासीच्या खरेदी-विक्री करणे,भूमी अभिलेख अधिकारी श्री.एन.जी .पठाण यांच्या कार्यकाळात झालेल्या फेरपर व आलापली,नागेपली गावठाण बाबत चौकशी करणे,अहेरी येतील साझा क्र.1 मधील अतिक्रमण नोंदी व उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे नोंदींनीच्या सखोल चौकशी करणे,अहेरी येतील 207 जमिनीचे हक्कदारचे मय्यतनंतर खोटी संमती दाखवून पोटहिस्सा केलेल्या प्रकरणाची व मय्यत झालेल्या व्यक्तीला परत जिवंत दाखवून एन.ए.पी 34 करीता मागणी केलेल्या बाबतीत चौकशी करणे,तसेच अहेरी येतिल गावठान 1921-22 मध्ये असलेल्या सर्वेनुसार गावठान नकाशात नोंद असलेले रस्ते सन 1974-75 मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठान नकाशात ते रस्ते दिसून येत नसून ते गायब झाले असून वरील सर्व मागण्यांच्या घेवून अहेरी येतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वीकृत नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार यांनी तीन दिवसापासून उपोषणाला बसले असून तीन दिवसापासून पोलीस कर्मचारी उपोषण स्थळी भेट देत आहेत,मात्र संबंधित प्रशासन विभागाचे कर्मचारी अधिकारी याकडे कानाडोळा (दुर्लक्ष) करत आहेत.