Home मुख्य बातम्या काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या कडून मदत

काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या कडून मदत

16
0

अहेरी : तालुक्यातील राजाराम ( खां )येथील राजू गंगाराम आत्राम वय ३२ वर्षे यांची दुचाकी अपघातात जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे.सविस्तर माहिती नुसार मृतक राजू आत्राम व मुलचंद कन्नाके यांनी MH-33 AF 1408 क्रमाकांचा दुचाकीने काही कामानिमित्त तेलंगाणा राज्यात जाऊन परत येत असताना अहेरी जवळील प्राणहिता नदीवरील वांगेपली-गुडेम पुला जवळ दुचाकी चालकाचा संतुलन बिघडल्याने दुचाकी पुलाजवळील खड्ड्यात आडळली यात राजू आत्राम जागीच ठार तर मुलचंद कन्नाके गंभीर जखमी झाला.

या गंभीर विषयांची माहिती काँग्रेस नेते व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलाडे – राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कांबगौनीवार यांनी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांना देताच त्यांनी तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डाक्टरांची व नातेवाईकांची भेट अपघातात विषयांची माहिती जाणून घेतले.

गंभीर जखमी झालेल्या मुलचंद कनाके यांचा उपचार करण्यास वैद्यकिय अधिकारीला सांगून कानके परिवारातील सदस्यांना औषध घेण्यासाठी आर्थिक मदत केले.तसेच मृतक नामे राजू आत्राम यांचा शवविचेधन करुन शववाहिका गाडी उपलब्ध करून राजाराम नेण्यासाठी त्या आत्राम कुटुंबियांना सुद्धा आर्थिक मदत केली.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह मृतकांचे नातेवाईक तसेच स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here