गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी तथा महाविकास आघाडीचे वं घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार डाॅ.नामदेवराव किरसान साहेबांचा प्रचारार्थ बैठक
अहेरी : गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणनीया बैठक आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित पार पाडले आहे.
बैठक दरम्यान कंकडालवार यांनी म्हंटले की’येत्या १९ तारखेला पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकारी मंडळींना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे संदेश देण्यात आले.
यावेळी बैठकीत सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,अहेरी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पप्पूभैया हकीम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,भास्कर तलंडेसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.